अट्टल आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यास वणीत 15 दुचाकीसह अटक....

अट्टल आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यास वणीत 15 दुचाकीसह अटक....
वणी (रवि ढुमणे)

यवतमाळ जिल्यातील तसेच लगतच्या चंद्रपूर,नांदेड, चंद्रपूर जिल्यातून दुचाकीची चोरी करणा-या तेलंगाना राज्यातील चोरट्यास उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच एलसिबी पथकाने 15 दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. एका चोरीच्या दुचाकीवरून इतर दुचाकी चोरीचा छडा लागला आहे.
   दुचाकीच्या वाढत्या चो-यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार,अपर पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी तातडीने दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी उपाययोजना करीत स्थानिक गुन्हे शाखा पथकाला शोधकामी पाठविले होते. गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिदमवार व त्यांचे सहकारी वणी परिसरात दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात उपविभागीय कार्यालयातील इकबाल शेख हे एलसिबी पथकासोबत चोरट्यांचा शोध घेण्यास निघाले असता.सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरून आसिफ पि युसूफ खान हा व्यक्ती काळ्या रंगाची बजाज पल्सर ही दुचाकी घेवून मुकूटबन घोन्सा चैफूलीवर उभा असल्याची विश्वसनिय माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथक,इकबाल शेख आदी मुकूटबन मार्गाने रवाना झाले. चैफूलीवर येताच. तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीला घेराव घालून त्याची कसून तपासणी केली असता. त्याने आसिफ पि युसूफ खान रा. लख्खाराम, मंडळ उटनूर जि. आदिलाबाद राज्य तेलंगाना असा पत्ता सांगीतला. वाहनाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेवून तपासणी केली असता सदर दुचाकी ही मुकूटबन रोडवरून चोरी केल्याचे आसिफ ने सांगीतले. सोबतच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा,पुसद, तसेच नांदेड जिल्यातील किनवट व चंद्रपुरातून देखिल दुचाकी चोरी केल्याचे आसिफने तपासणीत सांगीतले. आसिफला ताब्यात घेवून पोलीस पथक आदिलाबादच्या दिशेने रवाना झाले होते. लख्खापूर येथे येताच आसिफच्या घराच्या अंगणात चार लाख,पाच हजार रूपये किमतीच्या विविध कंपनीच्या 14 दुचाकी उभ्या दिसल्या. पोलीसांनी सर्व दुचाकी जप्त करून पथक वणीच्या दिशेने रवाना झाला. मुकूटबन मार्गावरील दुचाकी किंमत 40 हजार आणि लख्खापूर येथील 14 दुचाकी  एकूण किंमत चार लाख 45 हजार रूपये किमतीची वाहन जप्त केली. यातील 11 दुचाकीची ओळख पटली असून चार दुचाकी कोठून चोरून आणल्या याबाबत तपास सुरू आहे.  दुचाकी चोरट्यांचा छडा जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिदमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वणी येथील इकबाल शेख, एलसिबीचे गजानन डोंगरे,उल्हास कुरकुटे,किशोर झेंडेकर, पंकज बेले,आदींनी लावला आहे.

Post a Comment

0 Comments