सोळाव वरीस धोक्याचं?विद्यार्थी दशा पहिले ते चौथी संपूर्ण शिक्षण आई व शिक्षक ,त्यानंतर हळूहळू कळायला लागत. मग पाचवी ते दहावी खेळ अभ्यास

उनाडक्या सिनेमा, आता टॉकीज ची जागा घरातील टीव्ही ने घेतलीय. दहावी उत्तीर्ण झाले की पुढील प्रवेश यात कित्येक विद्यार्थी मुले भरकटत जातात.कारण काय असेल? हा प्रश्न यात मुलांचे प्रमाण जास्त आहे आणि मुलींचे कमी आहे. मुलांना लहानपणापासून आई वडील शिक्षक मन लावून मार्ग दाखवीत असतात। काही मुले आज्ञा पाळणारे असतात।तर काही केवळ देखावा दाखवून उल्लू बनवत
असतात. आता ते उल्लू कोणाला बनवतात हा खरा प्रश्न आहे त्यांना वाटते कि मी खोट बोललो कि सर्व जमते।पण ते यात स्वतःला उल्लू बनवत आहे हे मात्र त्यांना कळत नाही. सोळाव वर्ष म्हणजे तोल जाणार आहे।यात जो धैर्याने समोर गेला त्याने शिखर गाठलं समजा।पण याउलट त्याचा पाय घसरला तर सावरायला खूप कठीण जात. या वयात शारीरिक बदल पण आमूलाग्र प्रमाणात होत असते.  मुलांनी हेच समजायला हवं,,कि मला काय व्हायचे आहे।माझे भविष्य कशात आहे. मी काय केले पाहिजे. मी हे करू शकतो का. आणि स्वीकारू शकतो का? स्वीकार हा महत्वाचा भाग आहे.त्यात चांगलं आणि वाईट या दोन बाजू आहेत. मग चांगली बाजू कोणती हे तपासणे सुद्धा गरजेचे आहे. त्यासाठी मुलांनी स्वतःला किमान चार "क" स्वतःला नकीच विचारायला हवे. ते म्हणजे का? कसे?कुठे?केव्हा? आता हे क जर स्वतःला विचारले आणि ते आत्मसात केले तर यश पदरात आहे.यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवात स्वतः करायला हवी। मी बरोबर आहे का?माझं चुकलं असेल का? असे झाले असेल का?  आणि असे प्रश्न विचारले
स्वतःला कि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवे.  आई वडील जीवाचा आटापिटा करून वाढवत। असतात. पण मुलांना त्यांनी आपल्यासाठी किती पापड बेलले याची कल्पना नसते. किंवा त्यादृष्टीने मुले बघत पण नाही. जर मुलांनी आईवडील व गुरुजन हे आपल्यासाठी काय करीत आहे याची जाण ठेऊन आत्मपरीक्षण केलं तर त्यांचं भविष्य उज्वल आहे. पण असं होताना फार कमी
दिसते. मुले दहावी उत्तीर्ण झाली की त्यांना आईवडील गुरुजन यापेक्षा टवाळखोर मुले जास्त पसंद असतात. त्यामुळेच मुलांचा तोल जातो आणि या तावळखोरी मुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत.म्हणून मुलांनो जरा भविष्याचा विचार करून पुढील पाऊल टाकलं ना? तर सोळाव वरीस धोक्याचं असं म्हणायची पाळी येणार नाही.आईवडिलांकडे बघा .ते किती आटापिटा करतात. त्यांना सन्मान
द्या. आणि त्यांच्या कष्टाचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा

इतकंच....आमच्या वणी येथील पोलीस मित्र ग्रुप मध्ये मा। विश्वास नांगरे पाटील यांची पोष्ट शेअर केली.त्यातून हा विषय निवडला .मी रवी ढुमणे माझं शिक्षण जेमतेम झालं पण मला शिक्षणाची आवड आहे.म्हणून मी काहीतरी वेगळं
लिहायचा प्रयत्न करीत असतो. आपल्या लेकरासाठीच हि पोष्ट लिहिली आहे काही चुका पण असू शकतात.पण माझी विनंती आहे की आपल्या लेकरांसाठी हि पोस्ट शेअर करावी जेणेकरून काही परिवर्तन तरी घडेल..

जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम.जय ज्योती जय क्रांती     रवी ढुमणे  वणी जी यवतमाळ

Post a Comment

0 Comments