स्त्री रक्षण महाजागरासाठी वणीत उसळला जनसागर

वणीचे आमदार संजय रेड्डी बोदकुरवर डॉ गणेश राख यांच्या सोबत 
वणी

बेटी बचाओ अभियानाची विदर्भात प्रथमच वणीत सुरुवात झाली आहे.  यात बेटी बचाओ अभियानाचे प्रणेते डॉ गणेश राख यांनी उपस्थिती लावली होती. स्त्री रक्षणाच्या या महाजागरासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला होता.  बेटी बचाओ अभियानाच्या माध्यमातून देशात मुलींची संख्या कशी वाढेल आणि त्या शिक्षित कश्या होतील यावर विचार व्यक्त करण्यात आले मात्र वणी परिसरातील कुमारी मातांचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. आता स्त्री रक्षणाचा महाजागर कुमारी मातासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


विदर्भात पहिल्यांदाच बेटी बचाओ या डॉ गणेश राख यांनी सुरुवात केलेल्या अभियानाला वणीतून सुरुवात करण्यात आली.  येथील बेटी बचाओ जनआंदोलन समितीने पुढाकार घेत हे अभियान तनिष्का ला सोबत घेत राबविले.  शहरातील राजकीय,व्यावसायिक,शासकीय अधिकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते शाळांमधील विद्यार्थी शिक्षक पालक आदींनी सहभाग नोंदविला सकाळी आठ वाजताचे सुमारास बेटी बचाओ रॅलीला शासकीय मैदानातून सुरुवात झाली. जवळपास तासभर ही प्रचंड जनसमुदाय असलेली रॅली शहरातून काढण्यात आली. शहरातील अनेकांनी यात सहभाग नोंदवला होता.  


अद्यापही मुली नकोशा....?


भारतात गेल्या १२ वर्षात सहा कोटीहून अधिक मुलींची हत्या गर्भातच होते .आणि जवळपास २ कोटीहून अधिक मुली नकोशा असल्याचे एका अर्थशास्त्रीय सर्वेक्षणातून पुढे आले असल्याची माहिती डॉ गणेश राख यांनी शासकीय मैदानावरील सभेत दिली.  अजूनही लोकांची मानसिकता पाहिजे त्या पप्रमाणात बदलली नाही.  त्यासाठी बेटी बचाओ आंदोलन जोवर लढा पूर्ण होत नाही तोवर सुरूच राहील असे ही सांगितले.  इतकेच नव्हे तर उच्चशिक्षित आणि श्रीमंत लोकांमध्ये मुलीला कमी लेखण्याचे प्रमाण जास्त आहे. तर गरीब लोक मुलगा नाही होत म्हणून पाच ते सहा मुली जन्माला घालतात व त्यांचा सांभाळ सुद्धा करतात असेही सर्वेक्षणात स्पष्ट झाले असल्याचे मत डॉ राख यांनी व्यक्त केले. त्यासाठीच मुलगी वाचली तर देश वाचेल. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी पुण्यात व्यवसाय करणाऱ्या मनीष बुरडकर या तरुणाने पुढाकार घेत डॉ गणेश राख यांना वणीत अभियान सुरू करण्याची विनंती केली आणि स्त्री रक्षणाच्या महाजगरात वणीत जनसमुदाय उसळला.

वणी परिसरातील कुमारी मातांचा प्रश्न ऐरणीवरच?
वणी परिसरातील झरी तालुक्यात शेकडो कुमारी माता आहेत. रोजमजुरी करून त्या मुलांचा सांभाळ करीत आहेत.  मात्र शासनाने अद्याप त्यांना कोणत्याही योजना व लाभ मिळवून दिला नाही हेच खरे दुर्भाग्य आहे. पुढील काळात स्त्री रक्षणाचा महाजागर हे अभियान असेच चालू ठेऊन कुमारी मातांचा प्रश्नांना वाचा फोडण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.Post a Comment

0 Comments