संजय भाऊ देरकर लेट्स स्टार्ट न्यू इनिंग : आजाद एम.उदकवार

विदर्भ युवक मित्र मंडळ चे अध्यक्ष आझाद उदकवार यांनी संजय देरकर यांना लिहलेले पत्र सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

" विधानसभा चे रंगी बे रंगी राजकारण आत्ताच संपले...कोणी भावनेच्या लाटेत तर कोणी राष्ट्रं भावनेच्या लाटेत मतदान केले...पण जे आपण जन्मोजन्मी करत आलो आहे तेच आता पण केले आहे...अश्या अश्या लोकांना आज आपण आपल प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवले आहे...कि ज्यांचे अस्तित्व वयक्तिक काहीही नसून फक्त आणि फक्त लाटेत निवडून आले आहे...आज या निवडणुकीत 20 वर्षापासून सतत संघर्षरत असलेला माणूस संजय देरकर यांना आपण परत नाकारले आहे...चूक काय तर फक्त अपक्ष उभा राहाला हा गडी... पक्ष नाही तरी पण लाटेत हा तरंगला आणि सागराला आपल अस्तित्व दाखवून दिल...ज्यानी आता पर्यंत दिखावा नावाचे नाटक केले नाही...मदतीचा वाजागाजा गेला नाही येवढीच चूक या माणसाला भोवली आणि मतदान रुपी या देवरुपी माणसाला परत घरी बसवले...वनी विधानसभेत प्रत्येक नेता हा आपला हिस्सा घेऊन मोकळा होतो..पण संजय देरकर हे कधी हिस्सा आणि पैसा नावाच्या गोष्टी पासून शेवट पर्यंत चार हात लांब दूर आहे...पण जनतेने नाही तर नेत्यांनी या माणसाला सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जनतेत या माणसाला खाली दाखवल विविध आरोप केले आणि आमची साधी भोळी जनता याला भुरळ पडली आणि संजय देरकर हे वादळ थांबल...कूट पर्यंत आपण आपला विकास असाच मंदगतीत ठेवायचा आणि या वादळाला शांत ठेवायचे.....या निवडणुकीत सर्व अकार्यक्षम चेहरे असून सुध्दा परत परत त्याच चेहऱ्याला संधी अस का बर....?जो माणूस आपल्या ना नफा ना तोटा अश्या कंपनी मार्फत गोरगरीब शेतकऱ्यांचा कचरा सुध्दा विकत घेतो आणि त्या मायबाप शेतकऱ्यांना आधार देतो आणि त्याच मायबाप शेतकऱ्यांच्या पोराला रोजगार देतो पोट खळगी भागवतो तोच माणूस नको आहे मग हा वनी विधानसभा सुजलाम सुफलाम कधी व्हायचा....अस काय नवीन बदल घडवून आणला या सरकारने कि आपण परत एकदा तोच  माणूस बसवला या वनी विधानसभेत...आज झरी तालुका असो कि मारेगाव...डोळ्यात तेल टाकून पाहल तरी हा झालेला बदल दिसणार नाही...वनी हे तर विकासाशी संबध नसलेले एक माहेरघर आहे..मग ही माय बाप जनता इतकी भावना शून्य का झाली ? कि त्यांना रोजगार विकास..आणि सर्वंकष बदल करणारा माणूस न देता परत एक तोच नेता या विधानसभेच नेत्रुत्व करायला आपण या विधानसभेचे नेत्रुत्व करायला पुढ आणला..आपण सतत 30-40 वर्ष झाले त्याच त्याच लोकांत सत्ता वाटप करत आहे...नेमक अस का...संजय देरकर हे व्यक्तिमत्व अत्यंत साध सरळ आणि सर्वात सुशिक्षित आहे..तरी पण नकार या देरकरला फक्त केलेल्या कामाची प्रसिध्दी करता येत नाही येवढीच चूक या माणसाची...पण जो आवश्यक विकास आहे तो करणारा नेता आपण सतत घरी बसवायची प्रथा या आपल्या वनी विधानसभा मतदारसंघ मधे ठेवली आहे......मला अजूनही आशा आहे कि या वनी विधानसभेचा कायापालट करण्यासाठी देरकर हे एक सक्षम नेत्र्तुव आहे ...देरकर दांपत्य आणि त्यांच्या धरमपत्नी तर सतत सामजिक आणि महिला सक्षिमिकरण कार्यक्रमात कार्यरत असतात...खरेतर एखाद्या पक्षातून उमेदवारी सतत आपल्यालाच मिळावी या महत्वाकांक्षतून स्वतः नेत्यांनी सुध्दा बाहेर पडणे गरजेचे आहे..राजकारणात काही प्रयोग स्वःतावरही केले गेले पाहिजे...आपल्यातही बदल केला पाहिजे.निराग्रही व्रुत्तीणे,चुका सुधारून,निर्णय बदलवून सुध्दा जनतेपुढे गेले पाहिजे हे या निवडणूकानी दाखवून दिले आहे.सत्ता समीकरण प्रत्येक वेळी बदलत असतात.लोकांच्या अपेक्षांचा अचूक वेध घेण हे मुरब्बी राजकारण्याचे लक्षण असते.असा वेध वेध घेतला ना गेल्यामुळे आज वनी विधानसभा एक पोरखा झाला..तीच ती जुनी पद्दत नाव ना गाव देशाला ठाव....खरे तर सकारात्मकपणे ही बाब समजून घेऊन नव्या उर्जेने व नव्या रणणीतीणे मार्गक्रमण करणे अशावेळी आवश्यक असते.मात्र या वनी विधानसभेतील मतदार राजांना ही बाब लक्षात आली नाही..उलट आहे त्यात समाधान मानणं ही आमची परंपरा कायम ठेवली व एका चांगल्या सक्षम उमेदवार संजय देरकर यांना आपण यावेळेस मुकलो...यात नेमकी चूक कोणाची तर सर्वानाच आमदार व्हायच आहे....या स्वप्नांची...उलट मला यश मिळाल नाही तर तुला देखील मिळणार नाही,या आत्मघातकी प्रवृत्तीतून अनेक जण निवडणुकांमध्ये काम करत असल्याचे समोर आले..ही बाब अविकसित राहलेल्या वनी विधानसभेसाठी घातक व खेदाची...आणि मुळावर उठणारी ठरू शकते.अस म्हटल्या जाते की  जगामध्ये दुखी आत्म्यांची संख्या अधिक यासाठी असते कारण त्यानां इतरांचं यश पचनी पडत नाही.वनी विधानसभेच्या विकासाला या निवडणुकांनी खीळ बसण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.अशामुळे राजकारणात केवळ षडयंत्र करुन जनतेला फसवीणार्याण्ची संख्या अधिक वाढेल.शेतकरी,कामगार,मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक,विध्यार्थी,महिला यांच्याबद्दल कणव असणारे बदलाचा ध्यास असणारे,नविन्यचा हव्यास असणारे नेत्रुत्व मानसिक द्रुष्ट्या खच्ची होता कामा नए...संजय देरकर यांचा कार्यकाळ हा आतपर्यंत कुणालाही त्रास न झालेला मदतीस जवळ गेलेला आणि मदत मिळाली नाही असा माणूस सापडणार नाही...हा पण या माणसाचा अजिबात गाजावाजा नाही....आता हे पाच वर्ष वनी आणि विधानसभेच नशीब...ही माय बाप जनता सुखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कितीही अस्मानी संकट आल तरी या माझ्या माय बाप शेतकऱ्याला त्यातून सही सलामत बाहेर पडेल ही शक्ती मिळो. मी जरी आमदार नामदार नसलो तरी ही पाच वर्ष सतत जनतेचे प्रश्न उचलत राहील.माझा संघर्ष हा थांबनारा नाही..कारण तुम्ही जनता माझ सर्व काही आहे."

Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)