कामगाराची गळफास लावून आत्महत्या......कामगाराची गळफास लावून आत्महत्या......

वणी:-
पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपूर येथील किराणा दुकानात काम करणाऱ्या ४८ वर्षीय कामगाराने स्वतःचे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.
शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील रामदास बारु डाहूले हा कामगार गांधी चौकातील किराणा दुकानात कामाला होता. गेली २० वर्षे एकाच दुकानात काम केल्यानंतर या दिवाळीपासून कामावरून बंद झाला होता. हाताला काम नसल्याने तो विवंचनेत होता. घरात दोन मुले पत्नी,म्हातारी असा परिवार आहे. पत्नी आणि लहान मुलगा ओवळणीसाठी गेले होते. मोठा मुलगा मोबाईल दुकानात कामावर गेला होता. घरी म्हातारी होती. विवंचनेत असलेल्या रामदास ने घरी कोणी नसल्याचे बघून घराच्या अडयाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. सोमवारी सायंकाळी मोठा मुलगा कामावरून घरी आला होता तर पत्नी आणि लहान मुलगा ओवाळणी करून परत आले होते.घरी येताच रामदास ने गळफास घेतल्याचे दिसले. लागलीच त्याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments