निर्गुडेवरील बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणीत....... मार्गक्रमण करतांना मोठी अडचण....

निर्गुडेवरील बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणीत.......
मार्गक्रमण करतांना मोठी अडचण....

वणी:- शहरालगत असलेल्या चिखलगाव लागूनच वाहत असलेल्या निर्गुडा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे ऐन मार्गावरच भरमसाठ प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चिखलगाव परिसरातील शेतजमीन बहुतांश प्रमाणात व्यावसायिक उपयोगाकरिता वापरण्यात आली आहे. या गावातील शेतजमीन गावाच्या पश्चिमेला तसेच कळमना भागात शिल्लक राहिली आहे. गावाच्या पश्चिमेला निर्गुडा नदी वाहते आहे. या नदीवर बंधारे बांधण्यात आल्याने भरपूर पाणीसाठा साचला आहे. शेतात जाणाऱ्या महिलांना ओल होऊन शेतात जावे लागते आहे. सध्या शेतमाल घरात आणायची वेळ आहे. शेतकऱ्यांना एकमेव मार्ग असल्याने येथूनच वाटचाल करावी लागते आहे. परंतु पाणीसाठा भरपूर असल्याने तेथून वाहने नेणे सुद्धा कठीण झाले आहे. कमरेच्या वर पाणी असल्याने शेतमजूर महिला या भागात कामाला जाण्यासाठी पुढे येत नाही.परिणामी शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. ऐन हंगामात हे संकट आल्याने येथील शेतकरी डबघाईस आला आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष घालून उपायोजना करण्याची मागणी सरपंच अनिल पेंदोर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments