मुकुटंबन परिसरातील सिमेंट कंपनीच्या वाढत्या प्रदूषणाने शेतीवर अवकळा....

मुकुटंबन परिसरातील सिमेंट कंपनीच्या वाढत्या प्रदूषणाने शेतीवर अवकळा....
वणी(रवि ढुमणे)

वणी उपविभागातील मुकुटंबन परिसरात असलेल्या सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाने परिसरातील शेतकऱ्यावर अवकळा आली आहे. यासंबंधीची तक्रार अडेगाव येथील मंगेश पाचभाई या तरुणाने प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
सध्या मुकुटंबन परिसरात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत. यात येथे सुरू असलेली सिमेंट कंपनीचे उत्खनन आणि सिमेंट तयार करण्याचे काम सुरू आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आहे. या उद्योगातून निघालेल्या धुळीमुळे परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोबतच परिसरातील शेतपिकावर धुळीचा परिणाम होऊ लागला आहे. उत्पन्नात कमालीची घट येत आहे. एकीकडे अस्मानी संकटात अडकलेला शेतकरी आता या सिमेंट कंपनीच्या सुलतानी संकटात सापडला आहे. सदर कंपनीच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी अडेगाव येथील मंगेश पाचभाई या तरुणाने प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिली असून संबंधितांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments