हिन्दूह्रुदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिना निमित्त शवविच्छेदन करणारे मारोती किनाके यांचा सन्मान करून अभिवादन केले.

हिन्दूह्रुदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिना निमित्त  शवविच्छेदन करणारे मारोती किनाके यांचा सन्मान करून अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुख स्व .बाळासाहेब ठाकरे यांचा 7 वा स्मृतिदिन वणी येथे शहर अध्यक्ष राजू तुरांकर यांनी सकाळी 6 वाजता स्मारकाची जलाभिषेक करून हारार्पण केले. त्यानंतर गोरगरिबांना सोबत घेऊन कार्य करा त्यांना मदत करा, सन्मान करा असे विचार असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले राजू तुरांकर यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात वार्ड बॉय, जखमी रुग्णांवर ड्रेसिंग करणे व शवविच्छेदन असे सर्व काम फक्त 100 रुपये प्रतिदिन या मानधनावर काम करतात आणि उदरनिर्वाह कसा चालत असेल हा प्रश्न उपस्थित होतो.  समाजसेवक असणाऱ्या मारोती की किनाके यांचा सन्मान करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

शिवसैनिक राजू तूराणकर शहर प्रमूख   व नगर सेवा समिती दर रविवारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवितात व बाळासाहेब यांच्या स्मारकाला व परिसराला स्वच्छ करतात. सामान्य माणसाचा सन्माम करणे व त्यांना न्याय देण्याचा कार्य सेना करते म्हणून अल्प मानधनात सेवा देणाऱ्या मारोती किनाकेचा सन्मान करून त्यांच्या विचारला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. यावेळी माजी  उपजिल्हा प्रमुख दीपक कोकस, वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे, युवासेना वणी तालुका चिटणीस अजिंक्य शेंडे, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, सतीश लडके, शुभम गोरे, माजी नगर सेविका पुष्पा कुलसंगे, सुधीर थेरे, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, रवी देठे, प्रमोद मिलमिले, सुभाष ताजने, सचिन ठावरी व शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments