डोंगरगाव परिसरात तीन वाघांचा मुक्तसंचार? गाईवर हल्ला झाल्याची माहिती...

डोंगरगाव परिसरात तीन वाघांचा मुक्तसंचार?
गाईवर हल्ला झाल्याची माहिती...

वणी:- तालुक्यातील डोंगरगाव येथील विनोद रोगे या शेतकऱ्याच्या गाईवर वाघाने हल्ला केला असल्याची माहिती मिळते आहे. यात तीन वाघ बघितले असल्याचे शेतकरी सांगत आहे.

तालुक्यातील पळसोनी येथील कालर यांचे शेतात वाघाचे ठसे आढळले आणि मूर्धोनी येथील दोन गाईवर हल्ला झाला असल्याची घटना घडली असतांना शनिवारी डोंगरगाव येथील विनोद रोगे यांच्या शेतात बैल आणि गाई चरत असतांना वाघाने हल्ला केला. यात बैल सैरावैरा पळाले तर गय वाघाच्या तावडीत सापडली. या हल्ल्यात तीन वाघ असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरातील पळसोनी, मूर्धोनी,झरपट, निंबाळा,सोमनाळा आदी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments