मुकूटबन जिल्हा परिषद शाळेतील आर्थीक व्यवहार संशयास्पद


वणी  रवि ढुमणे
झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन येथिल जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाने अतिउत्साही होवून शाळा व्यवस्थापन समितीचे कोणतेही ठराव न घेता परस्पर लाखो रूपयाची उलाढाल केली असल्याची माहिती माहिती अधिकारातून पुढे आली आहे. परिणामी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सदर प्रकरणाची चाौकशी करण्याच्या मागणीची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.

झरीजामनी पंचायत समिती अंतर्गत येणा-या मुकूटबन येथील जिल्हा परिषद शाळेतील सन 2015-16 मध्ये कार्यरत असलेल्या प्रभारी मुख्याध्यापकांनी शाळा डिजीटल करण्याच्या अतिउत्साहीपणामुळे शाळेतील वर्ग 1 व 2 या वर्गखोलीच्या मधली भिंत पाडून वर्गातील बसण्याचे टेबल बाहेर काढून ठेवले होते. यातील 16 टेबलांची विक्री शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव न घेता परस्पर विक्री केली होती.  2017-18 या वर्षातील ई वर्ग जमिनीच्या 80 हजार रूपये रकमेचा खर्च करण्याचा ठराव 31 मार्च 2017 ला घेतला होता. परंतू जिल्हा परिषद शिक्षण समितीकडे 1 लाख 80 हजार रूपयाचा ठराव करून पाठविण्यात आल्याचे उघड झाले आहे. सन 2014-15 मध्ये वर्ग 1 ते 7 ला शिकविण्यासाठी 7 शिक्षक असतांना गावातील दोन अप्रशिक्षीत मुलींना शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव न घ्ज्ञेता स्वताचा वर्ग शिकविण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापकांनी शाळेवर नियमबाह्य रूजू करून घेतले होते. त्या अप्रशिक्षीत मुलींना मानधन देण्यासाठी शाळा डिजीटल मध्ये वर्गनी केलेल्या निधीतून खर्च केला आहे. 
     शाळा डिजीटल करण्यासाठी लोकवर्गणी व ’ई’वर्ग जमिनीच्या उत्पन्नातून जवळपास 5 लाख 65 रूपयांचा खर्च केवळ नावापुरताच असल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याचे पंकज मुद््दमवार यांनी स्पष्ट केले आहे.   ’ई’वर्ग जमिनीतून मिळणारे उत्पन्न आणि गोळा झालेली लोकवर्गनी या रकमेतील  खर्च एकाच व्यक्तीच्या नावे दोनदा दाखविण्याचा प्रकार प्रभारी मुख्याध्यापकाने केला होता.  मुकूटबन येथील जिल्हा परिषद शाळेला ओलीत आणि कोरडवाहू जमिन आहे. या जमिनीतून हजारो रूपयाचे उत्पन्न शाळेला मिळते.  मात्र सन 2015-16 मध्ये प्रभारी मुख्याध्यापकांनी जवळपास 44 हजार रूपयाची रक्कम शाळेच्या खात्यात जमा न करता परस्पर खर्च करून शाळेचे आर्थीक नुकसान केले असल्याचे उघड झाले आहे. सोबतच शाळेतील मुत्रीघराची दयनिय अवस्था आहे. शाळा समितीने दोनदा ठराव करून देखिल मुख्याध्यापकाने याकडे दूर्लक्षच केले असल्याने. वरिल गैरप्रकाराची आर्थीक अभिलेखा आधारे चाौकशी करून दोषी विरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी पंकज मुद्दमवार, रविंद्र तिपर्तीवार, दिलीप देवतवार,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच गणेश चितांवार, लोकेश धगडी सह ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडे केली आहे. 

Post a Comment

0 Comments