रानडुकराच्या हल्ल्यात कापूस वेचणारी महिला ठार , मंदर शिवारातील घटना


वणी : पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या मंदर शेतशिवारात शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून ४० वार्षिक महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तालुक्यातील मंदर येथील मीना शंकर खेडेकर ही महिला शेतात कापूस वेचणीचे काम करीत होती. दरम्यान शेतात असलेल्या रान डुकराने अचानक हल्ला चढवला, मीनाला प्रतिकार करता आला नाही. प्रसंगी या हल्ल्यात मीनाला गंभीर दुखापत झाली असल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. परिसरात जंगली श्वापदाचा व्याप वाढतो आहे. शेतकरी त्रस्त झाले आहे. एकीकडे अस्मानी संकट आणि इकडे जंगली जनावरे शेतमालाचा फडशा पाडत आहे. मात्र जंगली श्वापदापासून झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही,तर दुसरीकडे असे हल्ले होऊन शेतकरी,शेतमजूर प्राण गमावत आहेत. या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments