जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला गोड खाऊ......

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला गोड खाऊ......
वणी:(यवतमाळ)

नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र शेतकरी ,कष्टकरी या दिवाळीच्या धामधुमीत अस्मानी संकटात अडकले. ना लेकरांना कपडे ना घरी उत्साहाचा सण, साजरा केला. म्हणूनच आम्ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांना गोड खाऊ देण्यासाठी पुढे आलो. 


 खर तर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवून पालकांचा कल आपल्या गावातील या मंदिराकडे वळविण्यासाठी हा एक प्रयत्न करत आहोत.  नेहमीच जमेल आणि झेपेल तितकं शाळांना देण्यासाठी पुढे येतोच....यात बहुतांश वेळा अनेक वाईट अनुभव सुद्धा आले आहे.आणि त्याहून प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाला.
अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आमच्या उपक्रमाला सहकार्य केले आहे. एकीकडे मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या जातात मात्र ज्ञानाच्या मंदिराकडे ज्यांनी येथूनच शिक्षण पूर्ण केले आहे. जणू त्यांनीच या मंदिराकडे पाठ केल्याचे सुद्धा दिसते आहे. गावातील एकमेव मंदिराला जर सहकार्य आणि मदत केली तर भावी पिढीला कोणत्या खाजगी शाळेत जावे लागणार नाही. यात लेकरांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता नक्कीच उंचावेल....पण हे बोलायला सोपं आहे.आचरणात आणायला जरा कठीणच आहे. तरीसुद्धा प्रयत्न केले तर आपल्या शाळा नक्कीच शिखर गाठेल...दिवाळीचे  औचित्य साधून आम्ही लालपुलिया हिंदी माध्यमाची शाळा,जिल्हा परिषद शाळा झरपट, आणि मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोरज येथे जाऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिला प्रसंगी मुलांचा आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आणि हाच क्षण आम्हालाही मनोमन आनंद देऊन जात होता. ग्रामीण भागातील लेकरांच्या समवेत वेळ घालतांना खरोखरच जुन्या आठवणी ताज्या होतात हे तितकेच खरे.......
जिल्हा परिषद शाळांमधील उपक्रमात रवि ढुमणे,रवि कोमलवार, देवानंद गानफाडे, नामदेव बोबडे, मुख्याध्यापक लालपुलिया, सहायक शिक्षक विलास मोहूर्ले, गजानन दोडके,मुख्याध्यापक झरपट जिल्हा परिषद शाळा,हर्षदा मोहाडे सहायक शिक्षिका,आणि दौलत येरगुडे मुख्याध्यापक  जिल्हा परिषद शाळा गोरज आदींनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments