स्वहित व समाजहित : रवि ढुमणे यांचा विशेष ब्लॉग

स्वहित व समाजहित या भूतलावर जन्मलेल्या सर्व प्राणिमात्रांपैकी केवळ मनुष्य प्राणी स्वहित बघताना दिसत आहे. जन्माला आले कि प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाबडतो, हा नैसर्गिक नियमच आहे. बघा चिमणी च जर उदाहरण घेतलं तर जोवर पिलांना पंख फुटत नाही ते उडायला लागत नाही तोवर चिमणी आवर्जून जबाबदारी पाडत असते पण एकदा पिलांना पंख फुटले कि ते स्वतः उडून जातात. नी ओळखही विसरतात. हा नैसर्गिक गुणधर्म च आहे. याउलट मनुष्य असा प्राणी आहे कि तो मुलाना जन्म देतो,संगोपन करतो, पालन पोषण करतो, शिक्षण कामकाज असे नवनवीन धडे देतो. इतकंच नव्हे तर मुलांच्या आयष्याची संपत्ती सुद्धा स्वतः करून देतो, यात बघा पाखर हे पंख फुटेपर्यत जबाबदारी घेतात नंतर स्वावलंबन हा गुणधर्म देऊन मोकळे होतात. यात मनुष्य खूप लोभी स्वार्थी आहे हेच दिसत. सकाळी घरून निघताना माझं हे काम ते काम आहे. अस करीत बाहेर पडतो. व करतो सुद्धा हे केवळ स्वतःसाठी झालंय. कधी येणार कोणतही काम हे आपलंच आहे, कोणासाठी आपली मदत होईल का ? किंवा इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे हि ईच्छा 99 टक्के लोकांच्या मनात येत नाही.सहकारी तत्व हे मूक असलेल्या प्राण्याकडून शिकायला मिळते. परंतु मानव हा खूप लोभी नी स्वार्थी आहे. जन्माला घातल्या पासून ते नोकरी पर्यँत तो माझं म्हणून करत असतो. बापाची जबाबदारी म्हणून पार पाडतो. मुलांसाठी सर्व तयार करतो. बदल्यात काय मिळत जेव्हा हीच मुलं चांगल्या हुद्यावर जातात. तेव्हा त्यांना आई वडील किरकोळ वाटू लागतात. अश्या बऱ्याच घटना बघायला मिळत आहे. याउलट काही आई वडील तर माझं लेकरू म्हणून त्याच लग्न झाल्यावर सुद्धा त्याला लहानच ठेवतात.  स्व स्वार्थासाठी व मोठेपणाचा आणि मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी समाजात पांढरा बुरखा पांघरून मिरवत असल्याचे हि बघायला मिळत आहे. या स्वार्थी बापाच्या मोठेपणा मुळे जबाबदारी पेलण्यास सज्ज झालेली मुले अद्याप लहान बाळासारखे वागत आहे. त्यांच्या या स्वार्थी सवयीमुळे कित्येकांची प्रगती सुद्धा खालावली आहे. अशी मुले अद्यापही परावलंबी असल्याचे बघायला मिळत आहे. सामाजिक वसा घेऊन मिरवणारे इतरांना सल्ले देण्यात कुठेही कसर सोडत नाही. जेव्हा स्वहित येत तेव्हा हीच समाजसेवी मंडळी आपला फायदा काय? हे बघायला मागे रहात नाही. जन्माला आलो बापानं कर्तव्य पार पाडलं पंख फुटली कि प्रत्येकानी चिमणी पाखरा सारखे गुण जोपासत स्वावलंबी व्ह्यायला हवं.  जन्मदात्याने कर्तव्य पूर्ण केलंय आता आपलं कर्तव्य काय? हि जाण ठेवायला हवी,   थोर पुरुषांचे विचार अंगिकृत करून समाजासाठी काहीतरी करायला हवं. घरी दोन वेळेची भाकर भाजी ची सोय करूनच परोपकार साधायला हवा.जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे. मग जाताना आपण किती घेऊन जातो हे बघणे तितकेच महत्वाचे आहे. प्रॉपर्टी माझ्या बापानं ठेवली आहे अस म्हणायला बोटावर मोजण्या इतके सुद्धा मिळणार नाही. पण सामाजिक कार्य करीत असताना एखादी गोष्ट अशी घडते कि ते नाव सदैव लोकांच्या तोंडात राहते. हे त्रिवार सत्य आहे. समाज कार्य करीत असताना समाजाचा घरातील लोकांचा प्रखर विरोध होतो.  समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात. परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.           
 दुस-याच्या ताटातलं हिसकाटून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुस-याच्या तोंडात भरवण्यात समाधान .हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की , दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधीउपाशी राहत नाही.. असे विरोध बघायला मिळतात पण संपत्ती पेक्षा सामाजिक काम हे नेहमीच वरचढ राहील आहे.संपत्ती कमावली कोणी कशी तिची वाट लावली हे सुद्धा बघायला नसतो आणि त्यावर आपलं नाव पण कोरलेलं रहात नाही. मात्र विचार हे नेहमी मनात कोरलेले असतात.स्वहित जोपासा पण मर्यादित समाजहिताला सीमा नाही समाजहित जोपासणारी माणसे कुठेच कमी पडत नाही. कारण त्यांच्या जवळ कार्याची पावती असते व स्वहित जोपासणाऱ्या जवळ केवळ संपत्ती असते.म्हणूनच म्हणतात ना कि पैशापेक्षा सम्बंध कामात येतात. तर अगदी खर आहे.बघा मी यातून गेलेलो आहे.पोटापुरत कमावतो पण अक्खा दिवस इतरांसाठी घालवत आलो आहे. कदाचित अनेक लोकांना राग,द्वेष, मत्सर पण वाटला असेल माझा पण हेच सत्य आहे.  कोणतेही न होणारे काम हे पैशाने नाहीतर समाजसेवा केल्याने खरोखरच होते हे मी स्वतः बघितलं आहे.   इतरांसाठी काहीतरी करण्याची धडपड मनात बाळगून फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कार्य अजरामर राहत हेच खर आहे.माफ करा मी उपदेश वगैरे करीत नाही. स्वतःचे विचार व मनोगत व्यक्त केलंय. आवडलं तर पुढं पाठवा नसेल तर काढून टाका. वाचताना जर त्रास झाला कोणालाही टीका केल्या माझ्यावर।चांगले आहे असे म्हटले या सर्वांना मी धन्यवाद देतो व त्यांचे हि मनापासून आभार मानतो। हे माझे व्यक्तिगत विचार आहे।यात एक संदर्भ मा विश्वास नांगरे पाटील यांचा घेतला आहे. लिहिताना आठवलं म्हणून तो सुविचार यात टाकला आहे.काही चुका असल्यास व नकळत मन दुखवल्यास मी माफी मागतो.


विशेष म्हणजे  छत्रपती शिवाजी राजे,शंभूराजे,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू, या थोर पुरुषांचे विचार अग्रस्थानी आहेत.

रवी ढुमणे वणी जी यवतमाळ ( 9423131824 )

Post a Comment

0 Comments