अखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........

अखेर त्या खूनातील आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या...........
वणी(यवतमाळ) रवि ढुमणे

मारेगांव येथील बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह चिखलगांव बायपास वरील रेल्वे फाटकावर पडून असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे फिरविली होती. अवघ्या काही क्षणातच बेपत्ता तरूणाच्या खूनातील आरोपींना उपविभागीय पोलीस अधिकारी, मारेगांव पोलीस आणि पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे.
मारेगांव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेला योगेश गहूकर हा 28 वर्षीय तरूण शुक्रवारी सकाळी वाहन चालविण्याचा परवाना काढायला जातो असे सांगून स्वताच्या नविन दुचाकीने वणीकडे निघाला होता. मात्र तो घरी परतला नसल्याने योगेश बेपत्ता असल्याची तक्रार मारेगांव ठाण्यात देण्यात आली होती. पोलीस योगेशचा शोध घेत होते. शनिवारी योगेशचा मृतदेह चिखलगाव बायपास रोडवरील रेल्वे फाटकाजवळ आढळला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, वणी पोलीस, मारेगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्यांच्या पथकाला तपासकामी लावले होते. पथकातील इकबाल शेख व सहकारी तपासकामी रवाना झाले होते. इकडे बारीकसारीक मुद्दे तपासण्यात अधिकारी व्यस्त होते. अनेक बाबी तपासण्यात आल्या होत्या. यातच योगेश हा मारेगाव येथून वणीत आलाच नसल्याची माहिती पुढे आली. मोबाईलचे रेकार्ड तपासण्यात आले होते. त्यावरून अनेकांची चैकशी करण्यात आली होती. प्रसंगी राजेश रामकृष्ण भोंगळे मारेगांव व सुशांत बाळानाथ पुनवटकर कोलगांव ही दोन नावे समोर आली. पोलीसांनी दोघांवर शरसंधान साधून दोघांना ताब्यात घेतले होते. सर्व बारकावे तपासल्यानंतर योगेश, राजेश आणि सुशांत हे मारेगांव रस्त्याने वणीकडे मिळून येत असतांना वाटेत असलेल्या गौराळा खदानीजवळ थांबले असल्याचा सुगावा पोलीसांना लागला. त्यावरून दोघांची कसून चैकशी केली असता केवळ साडेचार हजार रूपयांसाठी राजेश आणि सुशांतने योगेशचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोलीसांनी गौराळा खदान गाठून घटनास्थळ पंचनामा केला असता योगेशचा खून गौराळा येथे शुक्रवारी दुपारचे सुमारास करून त्याचा मृतदेह शनिवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ आणून टाकला असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेह मिळताच अवघ्या काही क्षणातच पोलीसांनी योगेशच्या मारेक-यांना बेड्या ठोकल्याने पोलीसांची कामगिरी उल्लेखनिय असल्याचे बोलल्या जात आहे.

अवघ्या साडेचार हजारासाठी खून?
योगेश,राजेश, सुशांत हे मित्र होते. या मित्रांचा पैशाच्या देवानघेवाण वरून वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अवघ्या साडेचार हजार रूपयांसाठी मित्रानेच मित्राला संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र परिसरात उलटसुलट चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. सध्या राजेश आणि सुशांत पोलीसांच्या ताब्यात आहेत. पोलीस तपासात आणखी काय उघड होते हे स्पष्ट होणारच आहे. मात्र केवळ साडेचार हजार रूपयासांठी सधन कुटूंबातील तरूणाने खून करावा हे एक कोडेच आहे.

Post a Comment

0 Comments