तरुणाचा अकस्मात मृत्यू.....

तरुणाचा अकस्मात मृत्यू.....
वणी(रवि ढुमणे)

वणी शहरात उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
राळेगाव तालुक्यातील सोयटी गावातील रामू हरिदास भोसले वय ३५ या तरुणाला पत्नी आणि भावाने वणी शहरात छातीत व पाठीत दुखणे असल्या कारणाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सांगण्यात आले आहे. रामुला खाजगी रुग्णालयातून वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रसंगी रामू ला मृत अवस्थेत आणल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. रामुचा मृत्यू आधीच झाला होता. मात्र रामुला नेमका आजार कोणता होता आणि कोणत्या खाजगी रुग्णालयात उपचार केले होते हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. तूर्तास रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती वणी पोलिसात दिली आहे.

Post a Comment

0 Comments