ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे का ?

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे का ? याची प्रमुख कारणे ....ग्रामीण भागात अद्याप शिक्षणाचे महत्व जनतेला कळलेच नाही ..
कारण गावपुढारी राजकारण करतांना  शाळेला ही सोडत नाही ..

शिक्षकांना त्रास देने .त्यांची तक्रार करणे ,शाळा बांधकाम ,पोषण आहारात भ्रष्टाचार करायला भाग पाडणे , निमंत्रणावरून वाद करणे .शिक्षक केंद्रप्रमुखांना वेठीस धरणे असे प्रकार गाव पुढारी ,पदाधिकारी करीत असतात ..परिणामी शिक्षकांचे शिक्षणात लक्ष लागत नाही ..पुढारी लोकांच्या वेढ्यात शिक्षक अडकून पडतो .
यात ग्राम व्यवस्थापन समिती सुध्दा तितकीच दोषी आहे .त्यांचे पाल्य शाळेत शिकत असतांना ते ही राजकारण करायला मागे येत नाही ..

शाळा ,शिक्षण काय असते ते अजून त्यांना कळलेच नाही ..तालुक्यातील लोकप्रतिनिधी च्या इशार्यावर शाळेतील शिक्षकांना त्रास देने या पलीकडे त्यांना काहीच घेणे देणे नाही ही वस्तुस्थिती आहे ..

गावातील शाळा सुसज्ज ,आधुनिक कशी बनेल याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे ..पुढार्यान्ना काय हव तर तो म्हणे सन्मान ..मग जेव्हा शाळांनां मदत करायची वेळ येते तेव्हा ग्रामस्थ पुढारी शिक्षकाकडे बोट दाखवीत असतात ..बोलायला काय जात हो ..जर प्रत्येकच ग्रामस्थांनी आणि पुढार्यान्नी मनात आणले तर आमची गावातील शाळा शहरातील शाळेच्या तुलनेत कुठेच मागे दिसणार नाही .हे सत्य आहे ..
मी आपणांस कळकळीची विनंती करतो की ,गावातील मंदिरांवर खर्च करण्याऐवजी शाळेलामंदिर समजून तेथे देणगी द्या ! शाळा मंदिर आहे ..हा देव सर्वांचे भले करतो ..कोणालाही काहीच कमी पडणार नाही ..म्हणून प्रत्येकच गावातील लोकांनी आपल्या गावातील शाळांना मदत करायला हवी ..मंदीरांवर आपण खूपच खर्च करतोय !पण त्यापासून मिळत काय ? जर तितकाच खर्च शाळावर केला .तर त्यापासून भावी पिढी घडेल ..देव शाळेत आहे ..इतक ध्यानात असू द्या नी आपली शाळा गावातील सर्वात पहिले मंदिर आहे ..म्हणून आता शाळावर लक्ष केंद्रित करा ...
मित्रांनो हा संदेश आपल्या ग्रामीण भागात प्रसारित करा ही कळकळीची विनंती मी आपणांस करीत आहे ..
जय शिवराय जय भीम ..राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ,माझी माय जीजाऊ सावित्री 


आपला नम्र
रवि ढुमणे वणी
जि यवतमाळ 

Post a Comment

0 Comments