वणी येथे संविधान दिन साजरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीरेल्वे स्टेशन. विठ्ठल वाडी. गौरकारवाडी,यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26नोव्हेंबर2019रोज मंगळवार संविधान दिन साजरा करण्यात आला, धम्म ध्वजारोहण, बुद्ध वंदना व संविधान उद्देशिकेचे वाचन करून, भारतीय संविधान व त्यांची उपयोगीता या विषयावर प्रमुख अतिथी, आद.प्रविण वनकर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आद.सुषमा ताई दुधगवळी कैद्रीय शिक्षीका व आद.विजय बहादूरे सर प्रामुख्याने उपस्थित होते सुत्रसंचालन विनोद जी गजभिये यांनी केले, पंचशील पठण स्पर्धा, भाषण स्पर्धा, सम्यक सवाल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी स्पर्धेत सहभागी मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले, परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सायंकाळी 6वा.संविधान सन्मान रेली वणी तील प्रमुख मार्गाने काढण्यात आली डॉ. आंबेडकर चौक येथे समारोप झाला.

Post a Comment

0 Comments