काही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात..... रविनगर भागातील घटना...

काही तासातच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात.....
रविनगर भागातील घटना...

वणी(रवि ढुमणे)
वणी शहरातील रविनगर भागातील आसुटकर यांचे घराच्या माळ्यावरील खोलीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेचा आरोपी आणि मृतक शोधणे पोलिसांपुढे जणू आव्हान होते. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच  नागपूर येथून मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रविनगर भागातील आसुटकर अनिल आसुटकर यांच्या घरी आर्वी जिल्हा वर्धा येथील करण कश्यप हा तरुण खोली किरायाने करून रहात होता. करणचा चा सतीश देवासे हा मोर्शी जिल्हा अमरावती येथील मित्र चंद्रपुरातील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता. सतीशचे करण कडे ६० हजार रुपये कर्ज होते. ती रक्कम सतीश करण ला मागत होता. सदर रक्कम करण चुकवू शकत नसल्याने करणने सतिशचा काटा काढायचे ठरविले. आणि रविनगर येथील खोलीवर नेऊन सतिशचा रविवारी खून केला. सतिशचा मृतदेह एक पोत्यात भरला मात्र तो मृतदेह त्याला बाहेर काढता येत नसल्याने मृतदेह तसाच ठेऊन पळ काढला.
या घटनेची माहिती मंगळवारी लागताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,ठाणेदार वैभव जाधव,आणि पोलीस  घटनास्थळ पंचनामा करीत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,इकबाल शेख हे आरोपीच्या शोधात बाहेर पडले. त्यांनी मोबाईल लोकेशनचा आधार घेत बजाजनगर नागपूर गाठले. अत्यंत हुशारीने काचीपूरा भागात मामाच्या घरी आडोसा घेऊन असलेल्या करण कश्यप ह्याला नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. ६० हजार रुपयांची केलेली उचल परत करायची नसल्याने करण ने मित्राचा निर्घृण खून केला असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या काही तासातच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि चमूने आरोपींना ताब्यात घेतल्याची ही दुसरी घटना आहे.

Post a Comment

0 Comments