निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा असलेला शेतकरी हरला.......किरण देरकर

निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा असलेला शेतकरी हरला.......किरण देरकर
वणी(यवतमाळ)
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोण जिंकले व कोण हरले यावरच गणिते मांडणे सुरू आहे. पण या निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा असलेल्या शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त नामुष्कीजनक पराभव झाला असल्याचे मत किरण देरकर यांनी व्यक्त केले आहे.
          नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेतकरी आणि शेती समस्या हाच निवडणुकीचा आणि प्रचाराचा मुख्य विषय होता. जो तो अगदी शेतकऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचत होता.  मात्र निवडणूक संपताच राजकीय नेत्यांनी आपला पवित्रा सोयीस्कर बदलला आहे.
        शेतकरी शेतात कुजत पडलेल्या शेतमालासह आकाशाकडे बघुन रडत असताना  हेच नेते राज्यात सत्तास्थापनेमध्ये मग्न आहेत. आणि विरोधी बाकावर बसणारे विरोधी पक्षही दुरूनच बघ्याची भूमिका वठविताना दिसते आहे.
            केवळ मिडियाच यामध्ये काही प्रमाणात राज्यकर्त्यांचे डोळे ऊघडण्याचा प्रयत्न करीत आहे. यात सोशल मीडिया अग्रस्थानी आहे.
       शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये देण्यापेक्षा त्याला जगण्यासाठी हमी भाव,विज बिलात सवलत,बिनव्याजी कर्ज व सरसकट कर्जमाफी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच शेतकरी जगेल. जर शासन मदत करायला पुढे येत असेल तर कोणतेही निकष न ठरवता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी असे मत किरण संजय देरकर यांनी व्यक्त केले आहे.
       म्हणुन राज्यकर्त्यांनो ज्याच्या भरोश्यावर निवडुन आलात,जो देशाचा पोशींदा आहे, त्याचे ऋण फेडायची हीच संधी आहे असा सल्ला सुद्धा किरण देरकर यांनी दिला आहे.
           जगाचा पोशिंदा कापसाला झाडावरच कोंब आल्याने आणि सोयाबीन मातीत मातीमोल झाल्याने हवालदिल झाला असतांना राज्यकर्ते सत्तेच्या समीकरणात गुंग झाले आहे. परिणामी निवडणुकीत अग्रस्थानी असलेला शेतकरी दुर्लक्षित झाला आहे हेच खरे दुर्दैव आहे. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments