महाराष्ट्रातील एका बळीराजाची व्यथा मांडण्याचा मंगेश गोहोकर यांचा प्रयत्न

महाराष्ट्रातील एका बळीराजाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे.

''बाप''


दुःख गोठून मनात
बाप राबतो शेतात
शेतातील पिकाकडं
लक्ष त्याच मोत्यासम ।।१।।

कष्ट पाहून हो त्याचे
काटा खुपतो पायात
रगत लागते हृदयात ।।धृ।।

जसा घेण्याचा हो बैल
कष्ट करी दिन-रात
जीवन त्यागल हो त्यानं
एका धन्याच्या हो दारी
तसा कष्ट करी बाप
दिन-रात शेतामंदी  ।।२।।

कष्ट पाहून हो त्याचे
काटा खुपतो पायात
रगत लागते हृदयात

दुष्काळात शेतामंदी
पीक जाते त्याच वाया
या कर्जाच्या हो पायी
जीव देतो बळीराजा
त्याच्या कष्टाचं हो ऋण
फिटत नाही जन्मभर  ।।३।।

कष्ट पाहून हो त्याचे 
काटा खुपतो पायात 
रगत लागते हृदयात
रगत लागते हृदयात......


          -  मंगेश मधुकर गोहोकार (८८८८६१३१७९)

Post a Comment

0 Comments