वणीत सोयाबिन उत्पादक शेतक-यांची पिळवणूक..... मतांचा जोगवा मागणारे गप्पच?

वणीत सोयाबिन उत्पादक शेतक-यांची पिळवणूक.....
मतांचा जोगवा मागणारे गप्पच?

वणी(रवि ढुमणे)
वणी बाजार समितीमध्ये सोयाबिन उत्पादक तसेच कापूूस उत्पादक शेतकर-यांची चांगलीच पिळवणूक होतांना दिसते आहे. गेल्या महिण्यात मतांचा जोगवा मागणारे पुढारी आता मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसायला लागले आहे. अस्मानी संकटातून मार्ग काढून कसाबसा बाजारपेठेत माल घेवून आलेला शेतकरी सुल्तानी संकटात अडकला आहे. मात्र वजनमापे निरीक्षक आणि इतर यंत्रणा या गंभिर प्रकाराकडे दूर्लक्ष करतांना दिसते आहे.
सततचा पावसाळा त्यात उत्पादन कमी, अन कसेबसा शेतमाल काढून कर्ज,लेकरांना कपडे आणि घरात खाण्यासाठी काही आणायचा बेत करून बाजारपेठेत सोयाबिन आणि कापूस विकायला घेवून जाणा-या शेतक-यांची खाजगी बाजारपेठेत चांगलीच पिळवूणक होतांना दिसते आहे. खाजगी बाजारपेठेत शेतमालाचे वाहन गेल्याबरोबरच अत्यंत तोकड्या भावात खरेदीला सुरूवात होते. शेतमाल न बघताच त्याचे मोल करण्यात येते. आणि वाहन रिकामे होताच त्यातून अधिक मोल कमी करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. इतकेच नव्हे, वजन मापात सुध्दा मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत. नुकतेच पावसाने सोयाबिनची प्रतवारी घसरविली आहे. यात खाजगी बाजारपेठ हुकूमशाही धोरणे राबवून शेतक-यांना वेठीस धरण्याचे प्रकार करायला लागली आहे. वजनकाट्यात मोठ्या प्रमाणात तफावत असतांना देखिल  वजनकाट्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात येते हाच खरा संशोधनाचा विषय आहे. एकीकडे शेतक-यांना अग्रस्थानी ठेवून निवडणूकीत प्रचाराचा मुद्दा बनविणारे पुढारी आणि लोकप्रतिनीधी याकडे ढुंकूनही बघत नाही हेच शेतक-यांचे दूर्दैव आहे. खाजगी बाजारपेठे भयावह लूट होत असतांना सोयाबिन कापूस उत्पादक शेतकरी सुल्तानी संकटात अडकला आहे. तुटपुंजे पिक घेवून विकायला गेलेल्या शेतक-यांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने या लूटीला प्रशासकीय यंत्रणा देखिल खतपाणी घालतांना दिसते आहे. एकूणच अस्मानी संकटातून मार्ग काढणारा शेतकरी खाजगी बाजारपेठेच्या सुल्तानी संकटात अडकला असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. या गंभिर प्रकाराकडे आता राजकीय सामाजिक संघटना आणि वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments