गांधी चौकातील वादग्रस्त गाळे प्रकरणात शपथपत्र दाखल करण्याचे सक्त आदेश...

गांधी चौकातील वादग्रस्त गाळे प्रकरणात शपथपत्र दाखल करण्याचे सक्त आदेश.....

वणी:;-
शहरातील गांधी चौक परिसरातील दुकान गाळे प्रकरणात वेळोवेळी नवनवीन आदेश मिळूनही गाळे रिकामे झालेच नाही. सदर प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात सुरू होते.नुकतेच पालिकेने गांधी चौकातील गाळे रिकामे करण्याची नोटीस सुद्धा बजावली होती. गांधी चौकातील गाळे रिकामे करण्यासाठी अनेकदा आदेश बजावण्यात आले असतांना अद्याप गाळे जैसे थे स्थितीत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गांधी चौक भागातील वादग्रस्त गाळे प्रकरणात सद्यस्थितीत मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने नगर विकास मंत्रालयाला पुढील तारखेपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे सक्त आदेश देत मागील आदेशाचा पुनरुच्चार सुद्धा केला आहे. 

Post a Comment

0 Comments