विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैल जागीच ठार...... महावितरण च्या गलथान कारभाराने शेतकरी पोरका...

विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैल जागीच ठार......
महावितरण च्या गलथान कारभाराने शेतकरी पोरका...

वणी(रवि ढुमणे)
तालुक्यातील नांदेपेरा येथे जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकरी पोरका झाला आहे.
तालुक्यातील नांदेपेरा येथील अण्णाजी गणपत गोहोकार या शेतकऱ्याची बैलगाडी जात होती. वाटेतील नाल्याजवळ जिवंत विद्युत तारा पडलेल्या होत्या. बैल पाणी पिण्यासाठी नाल्यात जाताच विद्युत स्पर्श झाला अन दोन्ही बैल जागीच ठार झाले. यात शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन शेतमाल घरात यायच्या वेळी ही अघटीत घटना घडली असल्याने सोबतीला असेलेले जिवाभावाचे सवंगडी सोडून गेले आहे परिणामी शेतकरी पोरका झाला आहे. सुदैवाने बैलगाडीत बसलेले दाम्पत्य उडी मारून बाहेर पडल्याने सुखरूप आहे. 
तारा तुटून असल्याची माहिती महावितरण ला नव्हती की त्यांचे अधिकारी व, कर्मचारी कामावर नव्हतं हे एक कोडेच आहे. महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.शासनाने त्वरित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्या चंद्रज्योती सुरेश शेंडे यांनी केली आहे.अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments