मारेगांव येथिल बेपत्ता तरूणाचा खूनच.............. मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...

मारेगांव येथिल  बेपत्ता तरूणाचा खूनच..............
मृतदेह चिखलगांव बायपास रेल्वे फाटकाजवळ...

वणी-(यवतमाळ)  रवि ढुमणे
वणी उपविभागातील मारेगांव रोड येथील तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र सदर युवकाचा खून करून त्याचा मृतदेह चिखलगांव जवळील(बायपास) रेल्वेच्या फाटकाजवळ टाकून आरोपींनी पोबारा केला असल्याचे आढळले आहे. आता हा खून कोणी केला? कोणत्या कारणाने केला हे जरी अस्पष्ट असले तरी पोलीस आरोपींच्या शोधात लागले आहेत.
     मारेगांव येथील योगेश रामभाऊ गहूकर 28, हा तरूण औद्योगीक प्रशिक्षण संस्था मारेगांव येथे कार्यरत होता. 1 नोहेंबर ला योगेश वणी येथे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बजाज पल्सर या त्याच्या दुचाकीने वणी शहरात आला होता. मात्र योगेश त्या दिवशी घरी परतलाच नाही. त्याच्या परिवाराने योगेशच्या मोबाईलवर फोन सुध्दा केले मात्र फोन उचलण्यात आला नसल्याने कुटूंबियांची चिंता आणखीच वाढली होती. शेवटी पोलीस ठाणे गाठून हरविल्यासंबधी तक्रार देण्यात आली.

     मारेगांव ठाणेदार मंडलवार आणि जमादार आनंद अलचेवार आदी पोलीसांनी शोध मोहिम सुरू केली होती. अचानक शनिवारी दुपारचे सुमारास बायपास रेल्वे फाटक चिखलगांव जवळ तरूणाचा मृतदेह पडून असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. तत्पूर्वी योगेशची दुचाकी साई मंदीर परिसरात आढळून आली होती. यात पोलीसांना शंकेला वाव मिळाला. पोलीसांचा ताफा रेल्वे फाटकाजवळ पोहोचला. घटनास्थळाची पाहणी, मृतदेहाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी पथक व वणी पोलीस आदींनी करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठविण्यात आला होता.  या  घटनेत योगेश हा वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी वणीत आला. त्यानंतर कुठे गेला? त्याचे कोणाशी संबध होते का?. असे अनेक प्रश्न पुढे येत आहेत. दुचाकी साई मंदीर परिसरात होती. मृतदेह जवळपास दोन किमी अंतरावर टाकण्यात आला होता. गळ्याला दुपट्याने आवळल्याचे व्रण होते. सोबतच त्याचा मृतदेह संपूर्ण ओरबडून होता. पाय पुरते घासले होते. अनेक बाबी संशयास्पद आढळल्या आहेत. योगेशचे कोणाशी वैर होते की अनैतीक संबध असे अनेक प्रश्न सुध्दा चर्चिल्या जात होते. 28 वर्शीय तरूण शहरात येतो आणि 15 किमी अंतर असलेल्या गावाला जावू शकत नाही यात नक्कीच पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी वणी पोलीस आणि मारेगांव पोलीस तपास करीत असून लवकरच योगेशचे मारेक-यांना पोलीस बेड्या ठोकतील असे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments