वणीच्या ग्रामिण रूग्णालयात अनागोंदी कारभार?..... अधिका-यांकडूनच मिळते कारभाराला खतपाणी...

वणीच्या ग्रामिण रूग्णालयात अनागोंदी कारभार?.....
अधिका-यांकडूनच मिळते कारभाराला खतपाणी...

वणी(रवि ढुमणे)
सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविणा-या वणीच्या ग्रामिण रूग्णालयात सध्या अनागोंदी कारभाराला सुरूवात झाली आहे.  या कारभाराला येथील मुख्य असलेल्या अधिका-यांकडूनच खतपाणी मिळत असल्याने सामान्य जनता वेठीस धरल्या जात असल्याचे आरोप रूग्णांकडून होत आहेत. मात्र या अधिका-यांना वरिष्ठांचे पाठबळ लाभत असल्याने निराधारांचे चांगलेच हाल होतांना दिसते आहे.
     नेहमीच कोणत्याही कारणाने चर्चेत असलेले वणीचे ग्रामिण रूग्णालय. येथे पदसिध्द वैद्यकीय अधिक्षक नाही. गेल्या दोन वर्षापासून प्रभारावर असलेल्या या ग्रामिण रूग्णालयात मनमानी कारभाराला सुरूवात झाली आहे. एकीकडे मलेरिया सारख्या साथीच्या आजाराचे थैमान आहे. मलेरिया विभागाकडून नेमण्यात आलेला पर्यवेक्षक येथील वैद्यकीय अधिक्षकांच्या मर्जीतील असल्याने गल्लीबोळात जावून रूग्णांची माहीती व तपासणी करण्याऐवजी दिवसभर बॅग घेवून रूग्णालयात ठाण मांडून बसत असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे विद्यार्थी, निराधार महिला,वयोवृध्दांना दाखले देण्यासाठी सदर मलेरिया प्रतिनीधी पुढाकार घेवून चिरीमिरीत दंग झाला आहे. परिणामी शहरात मलेरियाचे रूग्ण किती आणि कोणत्या भागात आहे. याची देखिल माहिती संबधीताला नाही. इतकेच नव्हे सध्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी रूग्णालयात येत आहे. त्यांना सर्व तपासण्या करायला लावण्यात येत आहेत. सोबतच एक्सरे काढायला लावण्यात येत आहे. या सर्व प्रकारात एकीकडे रूग्णालयात मोठ्या प्रमाणात एक्सरे काढल्याचा बनाव यातून करण्यात येत असल्याचे आरोप सुध्दा होतांना दिसते आहे. या सर्व तपासण्यामध्ये गरिब बिद्याथ्र्याना नाहक भूर्दंड पडत आहे. एकीकडे शासन विद्याथ्र्यांना सोई-सुविधा उपलब्ध करून देत आहे. आणि येथे शासनाचे कर्मचारी सर्रास लूट करतांना दिसत आहे. तर दुसरीकडे ज्या महिलांच्या घरातील आधारच हरवला त्या महिला लहान लेकरे घेवून निराधार प्रमाणपत्र घेण्यासाठी रूग्णालयात येतात. त्यांना देखिल हे सोडत नाही अशी अवस्था येथे आहे. या कामासाठी मलेरिया कर्मचारी तैनात आहे. केवळ प्रमाणपत्र देण्यासाठी  या मर्जीतील  कर्मचा-यावर ग्रामिण रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक मेहरबान असल्याचे दिसते आहे. एकूणच वैद्यकीय अधिक्षकांच्या परवानगीनेच येथे मनमानी कारभार फोफावत असल्याचे यावरून दिसायला लागले आहेत. यात विद्यार्थी आणि निराधार बळी पडत आहे.

कंत्राटी अधिकारी कर्मचा-यांवर कुरघोडी......
सध्या रूग्णालयात शासकीय अधिकारी तिन आहेत. यात एक वैद्यकीय अधिक्षक, एक प्रसुती तज्ञ, व एक डाॅक्टर यातील प्रसुती तज्ञ वणी,झरी, मारेगांव येथील प्रसुतीसाठी तत्पर आहे. तिन ठिकाणी रूग्णांना सेवा देत असतांना या अधिका-याला कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. बाह्य रूग्ण विभागात रूग्णांची चांगलीच रेलचेल असते. अधिक्षक कक्षात अन रूग्णालयात गर्दी अशी अवस्था असतांना मानधन तत्वावर असलेल्या आयुष विभागातील डाॅक्टरांना उपचार करायला भाग पाडल्या जातांनाचे चित्र आहे. आयुष विभागातील डाॅक्टरांना होमिओपॅथी, आयुर्वेदीक उपचार करणे क्रमप्राप्त असतांना येथे आयुर्वेदीक, उपचार होवूच दिल्या जात नाही. रूग्णालयात आयुर्वेदीक, होमिओपॅथी औषधींचा साठा उपलब्ध नाही. तरीसुध्दा आयुष विभागातील उाॅक्टर सेवा देत आहे. मात्र येथिल प्रशासन या आयुष विभागातील मानधन तत्वारील डाॅक्टरांना नियमबाह््य सेवा द्यावी लागते आहे. दुसरीकडे मानधन तत्वावरील बालरोग तज्ञ, सर्जन, हे रूग्णांच्या सेवेत असतात. तर महिला तज्ञ डाॅक्टर बाहेरून या ग्रामिण रूग्णालयात येतात. या महिला डाॅक्टरांना अद्याप मानधन सुध्दा मिळाले नसल्याचे बोलल्या जात आहे. केवळ मानधन तत्वावर काम करणा-या डाॅक्टरांना तपासणीचा तगादा लावून स्वता मात्र कक्षातील हवा घेतांना येथील अधिक्षक दिसत आहे. तर शासकिय सेवेत असलेल्या परिचारिकांना वाटेल तेव्हा सुट्टी देण्यात येते आणि कंत्राटी परिचारीकांना रोज कामावर ठेवण्यात येते हेच खरे चित्र आहे. कमी वेतन वाल्या कर्मचा-यांना भरपूर काम आणि गलेलठ्ठ पगारवाल्याना मोठी सूट असे काहीसे चित्र येथे दिसायला लागले आहे.  अनेक ठिकाणी मनमानी कारभार बघायला मिळतो आहे. अतिसंवेदनशिल असलेल्या विभागात देखिल बाहेरील लोकांचा भरणा आहे. कार्यालय तर मोकाटच आहे. केवळ आर्थिक विभाग निट सांभाळण्यासाठी कार्यालयीन कर्मचा-याला मुभा दिली जात असल्याचे बोलल्या जात आहे.  दुपारी 12 नंतर कक्षात वेगळीच बैठक बसत असल्याची चर्चा चांगलीच रंगायला लागली आहे. केवळ मर्जीतील शासकीय कर्मचा-यांना मुभा देत मानधन तत्वावर काम करणा-या कर्मचा-यांना वेठीस धरून रूग्णालय प्रशासन रूग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. मनमानी कारभाराकडे जिल्हा शल्य चिकित्सकांचे सुध्दा दूर्लक्ष असल्याचे दिसत आहे. मागील काळात या रूग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सकांनी भेट देत स्वच्छतेवर भर दिला होता. सोबतच हिरकणी कक्षात निवास करणा-या कर्मचा-याला नोटीस बजावून त्याला प्रतिनियुक्ती देण्याचे तोंडी आदेश सुध्दा दिले होते. मात्र घोड अडलं कुठं हे त्यांनाच माहीत. सदर  कर्मचारी वणी रूग्णालयातच दिसला. यावरून जिल्हा शल्य चिकीत्सकाच्या सुचना येथे पाळल्या जात नाही. की हा केवळ देखावा आहे असा प्रश्न देखिल उपस्थित होत आहे. रूग्णालय प्रशासनाच्या मनमानी कारभाराने आता सर्वच त्रस्त झाल्याचे दिसायला लागले आहे. आता येथील लोकप्रतिनीधी यावेळी तरी ग्र्रामिण रूग्णालयाकडे विशेष लक्ष पुरविणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Post a Comment

0 Comments