भयावह मारपीटीनंतर गळा आवळून केला खून.....डीवायएसपी पथक, डीबी पथकाने आरोपीला केले जेरबंद...

भयावह मारपीटीनंतर गळा आवळून केला खून.....
डीवायएसपी पथक, डीबी पथकाने आरोपीला केले जेरबंद...
वणी(रवि ढुमणे)
स्पंदना या कंपनीमध्ये वणी आणि चंद्रपूर येथे काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये उचल केलेल्या पैशाच्या वादावरून भयावह मारामारी झाली अन त्यातच एकाने गळा आवळून मित्राला संपविल्याची घटना उघडकीस आली होती.  मृतक आणि मारेकरी अज्ञात असल्याने पोलिसांना शोध घेणे एक आव्हानच होते. अत्यंत शिताफीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वणी पोलिसांनी आव्हान पेलत अवघ्या काही क्षणातच मृतकाची ओळख पटवून आरोपीला नागपुरातून जेरबंद केले.
वणी आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी स्पंदना नावाची फायनान्स कंपनी कार्यरत आहेत. या कंपनीमध्ये आर्वी जिल्हा वर्धा येथील करण कश्यप हा वणी येथील कार्यालयात काम करीत होता. तर त्याचा मित्र सतीश देवासे रा.मोर्शी जिल्हा अमरावती हा चंद्रपूर येथील कार्यालयात होता. करण हा रविनगर भागातील अनिल आसुटकर यांचे घरी खोली किरायाने करून राहत होता. दरम्यान करणं हा आंबट शौकीन असल्याने त्याला अनेक सवयी जडल्या होत्या. अनेक मित्रांकडून उचल करणे आणि आपला शोक पूर्ण करणे जणू हा त्याचा छंद होता. असाच काहीसा प्रकार करण ने सतीश सोबत केला होता. सतिशकडून ६० हजार रुपयांची उचल केली होती. सतीश करणला दिलेले पैसे मागत होता. रविवारी सतीश चंद्रपुरातून वणीत करणकडे आला होता. दोघांनीही करण च्या खोलीवर बसून दारू ढोसली होती. यातच सतीशने करणं ला पैशाची मागणी केली होती. प्रसंगी दोघांत भयावह मारामारी झाली. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला होता.   या मारामारीत करण ने सतिशचा गळा दोरीने  आवळून खून केला. घरमालक म्हातारे असल्याने त्यांना धड ऐकू येत नसल्याने खोलीत काय घडले हे त्यांना कळले नाही. दुसऱ्या दिवशी करण ने सतिशचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि ती बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र करणं ची ही योजना असफल ठरली. गेली दोन दिवस करणं खोलीवर ये-जा करीत होता. मंगळवारी करणं बाहेर गेला होता. दरम्यान वरच्या माळ्यावरून दुर्गंधी येत असल्याने घर मालकाने करणं ला फोन केला. प्रसंगी करणं ने खोलीत घुस मरून पडून असल्याचे सांगून  तिला मी आल्यावर बाहेर काढतो असे सांगून फोन ठेऊन दिला. त्यानंतर दुर्गंधी आणखीच वाढली. शेवटी घरमालक,शेजारच्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन बघितले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, महिला पोलीस अधिकारी माया चाटसे, उपनिरीक्षक गोपाल जाधव,डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे,सुनील खंडागळे, सुधीर पांडे, डीवायएसपी पथकाचे इकबाल शेख,संतोष आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी आसुटकर यांचेकडून करणं चा मोबाईल क्रमांक घेऊन तपासाला सुरुवात केली. मोबाईल लोकेशन घेऊन डीवायएसपी इकबाल शेख ला घेऊन करण च्या मागावर निघाले तर इकडे ठाणेदार वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे सुनील खंडागळे, सुधीर पांडे व सोबतीला शेखर वांढरे,हे सुद्धा रवाना झाले होते. इकडे वणी पोलीस बारकावे शोधत होते. यातच रात्री दहा वाजताचे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,इकबाल शेख,सुनील खंडागळे,सुधीर पांडे आदी नागपूर गुन्हे शाखेला सोबत घेऊन मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन बजाजनगर भागात पोहोचले होते. त्यानंतर अत्यंत शिताफीने काचीपूरा भागातील मामाच्या घरात दडून बसलेल्या करणला अवघ्या काही तासातच पोलिसांनी जेरबंद करून मृतकाची ओळख पटवून घेतली. क्षणाचाही विचार न करता तपासाला गती देत पोलीस अधिकारी आणि पथकाने अज्ञात असलेल्या मारेकरी आणि मृतकाचा शोध लावला आहे. 

Post a Comment

0 Comments