माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर

 
झरी जामनी :-  थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक, संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब उर्फ मा सा कन्नमवार यांची पुण्यतिथी आज (ता २४) सतपल्ली येथे ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आला.
     सर्वप्रथम दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला हारार्पण करून शिबिराला सुरुवात झाली. राज बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने यवतमाळ येथील सुप्रसिद्ध डॉ.सचिन बन्सोड यांचा शिबिर घेण्यात आला. नाक, कान व घसा, घसा व तोंडाचे कँसर निदान व उपचार, एण्डोस्कोपि द्वारे तपासणी असे तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ घेण्याकरिता बहुसंख्येने रुग्ण उपस्थित होते.
 या शिबिराचे आयोजन राज बहुउद्देशीय संस्थेचे संचालक राज लक्षट्टिवार तथा बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष राकेश मदीकुंटावार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या आरोग्य शिबिरात सतपल्ली येथील सरपंच शंकर सिडाम उपस्थित होते. या शिबिराला सहकार्य  बेलदार समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी केली.

Post a Comment

0 Comments