रक्ताविराचा दिव्यांगासोबत वाढदिवस

वणी:- आदिवासी दुर्गम असलेल्या झरी जामनी तालुक्यातील मुकुटंबन येथील रक्तविराने वणी येथील दिव्यांगासोबत वाढदिवस साजरा केला आहे.
झरी तालुका म्हणजे आदिवासी बहुल तालुका,याच आदिवासी बहुल तालुक्यातील तरुण देशातील कित्येकांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहे. रक्तदान करून अनेकांना जीवदान देणारी ही झरी तालुक्यातील तरुण मंडळी, यात नुकताच राजस्थान येथे रक्तदान करणाऱ्या मुकुटंबन येथील प्रफुल भोयर या तरुणाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी तात्काळ रक्त उपलब्ध करून देणाऱ्या प्रफुल चा वाढदिवस वणी येथील अपंग निवासी कर्मशाळेत मित्रासमावेत अगदी सध्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. तरुणांचा वाढदिवस म्हटले की पार्ट्या ,जेवणावळी अनेक बाबी मात्र दिव्यांगासोबत वाढदिवस साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा रक्तविर प्रफुल भोयर याने आपला वाढदिवस अपंग शाळेत साजरा करून एक नवी दिशा दिली आहे.

Post a Comment

0 Comments