माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी, रोहन आदेवार
वणी -  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक, विदर्भ पुत्र स्व.मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची पुण्यतिथी 24 नोव्हेंबर 2019 (रविवार) रोजी सकाळी 08.30 वाजता कन्नमवार चौक,  वणी येथे साजरी करण्यात आली.

       आदरांजली कार्यक्रमाचे संचालन सागर बरशेट्टीवार यांनी केले.  अशोक आकुलवार आणि दिलीप कोरपेनवार सर यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विषयी माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी क. दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तसेच 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली देण्यात आली.
     या आदरांजली कार्यक्रमास नगर परिषद वणी बांधकाम सभापती राकेश बूग्गेवार उपस्थित होते. तसेच बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, युवा बेलदार शहर कार्यकारिणी, वणी, बेलदार समाज महिला कार्यकारिणी वणीचे सर्व पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments