लालपुलियातील एसबीआय शाखा ठरते ग्राहकांचे आकर्षक....

लालपुलियातील एसबीआय शाखा ठरते ग्राहकांचे आकर्षक....
.
वणी:- स्टेट बँक ऑफ इंडिया ने लालपुलिया चिखलगाव येथे शाखा सुरू केली आहे. येथील कार्यकुशल व्यवस्थापक रिपुंजय कुमार यांनी केलेल्या सहकार्यामुळे सदर शाखा ग्राहकांचे आकर्षक ठरते आहे.
     सध्या नवीन वेळापत्रकानुसार दररोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत बँक व्यवहार सुरू करण्यात आले आहे.  अत्यंत मनमिळावू आणि ग्राहकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आणि सर्व व्यवहार तात्काळ करण्यात अग्रेसर असलेले येथील व्यवस्थापक रिपुंजय कुमार हे सदैव ग्राहकांच्या सेवेत दिसतात. मग कोणतेही कर्ज,असो की खात्यातील अडचणी स्वतः पुढाकार घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न कुमार यांचा असल्याने ग्राहक त्यांच्याशी तितक्याच प्रेमाने वागताना दिसत आहेत. कोणत्याही अडचणी असल्यास स्वतः वरिष्ठांशी चर्चा करून बँकेतील खातेदारांना आधार देत असल्याने लालपुलिया शाखा ग्राहकांचे आकर्षक ठरते आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून स्वतःहून कार्य करणारा या परिसरातील पहिलाच व्यवस्थापक असल्याचे ग्राहकांच्या तोंडून ऐकायला मिळते आहे. मग ते गृहकर्ज, कारसाठी कर्ज, सोने तारण कर्ज आदी ग्राहकाला लवकर मंजूर करून देण्यासाठी सदर व्यवस्थापक स्वतःहून पुढाकार घेतांना दिसतो आहे. परिणामी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लालपुलिया शाखेत ग्राहकांचाओढा वाढला आहे.

Post a Comment

0 Comments