ग्रामीण रुग्णालयातील एचआयव्ही सल्ला व चाचणी केंद्र कुलूपबंद..... रुग्ण आल्यापावली परतले...

ग्रामीण रुग्णालयातील एचआयव्ही सल्ला व चाचणी केंद्र कुलूपबंद.....
रुग्ण आल्यापावली परतले...

वणी:- ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपळला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे मनमानी कारभाराला खतपाणी मिळते आहे. येथे एचआयव्ही रुग्णासाठी असलेले सल्ला व चाचणी केंद्राला चक्क कुलूप आढळल्याने रुग्णांना आल्यापावली परत जावे लागले आहे. आता येथे दोन समुपदेशक असतांना महत्त्वाचा विभाग बंद आहे यावरून येथील कारभार कसा आहे हे लक्षात येते आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयात जवळपास सर्वच विभागात मनमानी कारभार सुरु आहे. मलेरिया विभागातील पर्यवेक्षक शहरात रुग्ण बघण्याऐवजी रुग्णालयात प्रमाणपत्र देण्यासाठी ठाण मांडून बसला आहे. कार्यालयीन लिपिक अधिकाऱ्याची जागा घेत प्रभार असलेल्या परिचरिकाना थेट कारणे दाखवा नोटीस बजावत असल्याचे दिसत आहे. मनात येईल तेव्हा कार्यालयात येणे आणि काही वेळ थांबून निघून जाणे असे कारनामे या कार्यालयात सुरू आहे. तर विद्यार्थ्यांना तपासणी प्रमाणपत्रे देत असतांना येथे कार्यरत मलेरिया विभागातील कर्मचारी रीतसर पावती न देता पैसे घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. 
अत्यंत महत्वाचा समजला जाणारा एचआयव्ही सल्ला व चाचणी कक्षात दोन समुपदेशक आहे. यातील एकाने तरी शहरात जाऊन रुग्ण तपासणी,भेटीगाठी,मार्गदर्शन शिबीर आयोजित करून अहवाल सादर करणे अनिवार्य असतांना केवळ इतरांच्या कार्यक्रमात जाऊन फोटो काढणे आणि ते फोटो कार्यालयाला पाठवून दिशाभूल करण्याचे कामच जणू येथील समुपदेशक करतांना दिसतो आहे. सध्या या विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाहीच..केवळ कार्यालयात ठाण मांडून बसने इतकेच काम येथील समुपदेशक यांना असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे येथे दोन समुपदेशक कार्यरत असतांना शनिवारी चक्क या कक्षाला कुलुपच आढळले. दोघांपैकी एकही उपस्थित नव्हता. माहिती काढली असता एक समुपदेशक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरा न सांगताच गायब असल्याचे दिऑन आले आहे. रुग्णालयात मनमानी कारभाराला सुरुवात झाली असतांना स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठ मात्र बघ्याची भूमिका वठविताना दिसते आहे. आता कुलूपबंद असलेल्या कक्षातील समुपदेशकावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments