वाघ आला रे! आला........ पळसोनी परिसरात वाघाची दहशत कायमच....शेतकरी भयभीत...

वाघ आला रे! आला........
पळसोनी परिसरात वाघाची दहशत कायमच....शेतकरी भयभीत...
वणी (रवि ढुमणे)

वणी शहरालगत असलेल्या पळसोनी,झरपट शेत शिवारात वाघ असल्याच्या बातमीला आणखी पेव फुटले आहे. वाघ आला रे,आला म्हणून ग्रामस्थ शोधायला निघाले आहे. वाघाच्या भितीने शेतकरी,शेतमजूर मात्र भयभीत झाले आहे. वाघ आल्याच्या चर्चेची बातमी ऐकताच वनविभागातील अधिकारी कर्मचारी पळसोनी परिसरात दाखल झाले आहे. एकूणच वाघ आला रे, आला असा सगळीकडे बोलबाला आहे. मात्र तो दिसला कोणालाच नाही हे सुध्दा एक कोडेच आहे. परिणामी सत्य काय आहे. हे वनविभागानेच स्पष्ट करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे.
शहरापासून  अगदी पाच ते सात किलोमिटरचा चा परिसर म्हणजेच पळसोनी, राजूर, झरपट रविवारी दुपारची वेळ शेतकरी महिला व कापूस वेचणा-या मजूर महिला शेतात कापूस वेचणीसाठी गावातून निघाल्या होत्या. पळसोनी जवळून जाणा-या धरणाच्या पाटाने जावून शेतात शिरताच तेथून उडी मारून जनावर सैरावैरा पळाले. गेल्या आठवड्यात याच गावात वाघ असल्याच्या बातम्या सुध्दा प्रकाशित झाल्या होत्या. कापूस वेचणा-या महिलांना उडी मारून गेलेला वाघच असावा अशी शंका आली. त्या आल्यापावली गावात परत आल्या. ही बातमी वा-यासारखी परिसरात पसरली. झरपट-पळसोनी शेतशिवारातील शेतकरी एकमेकांना फोन करून माहिती देवू लागले. जवळपास चार डझन लोक वाघ शोधायला निघाले. पळसोनी,झरपट शिवार पिंजून काढला मात्र वाघ कुठेच मिळाला नाही. जवळच असलेल्या नाल्यातील चिखलात जनावरांच्या पावलांचे ठसे आढळले परंतू सदर ठसे हे जुनाट असल्याचे सांगण्यात आले. रविवारी दुपारी वाघ निघाला असता तर कुठेतरी ठसे किंवा शेतात काम करीत असलेल्या शेतकरी,शेतमजूरांना दिसला असता. मात्र वाघाचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. परिणामी वाघ आला रे, आला ही केवळ बतावणीच झाली. 
वाघाला शोधण्यासाठी ग्रामस्थ......

वाघ आल्याची माहिती मिळताच पळसोनी,झरपट गावातील ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य संघदीप बघत सुध्दा वाघाला शोधण्यासाठी वनविभागाती कर्मचा-यांसह शेत शिवारात फिरले होेते. नाल्यातील चिखलात असलेल्या ठशांचे मोजमाप सुध्दा करण्यात आले. परंतू सदर ठसे हे जुनाट असल्याचे दिसून आले. झरपट,पळसोनी शेतशिवारात काम करणारे मजूर काम न करताच घराकडे परतले तर शेतकरी डफडे वाजवून शेतात फटाके फोडतांना दिसले. एकूणच पळसोनी शिवारात आलेला वाघ हा सध्यातरी चर्चेत आहे. प्रत्यक्षात वाघाला कोणीही बघीतले नसल्याचे ही अफवा आहे की, सत्य घटना यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ?
वनविभागातील कर्मचारी अधिकारी पळसोनी शिवारात वाघ आल्याची बातमी ऐकताच परिसरात तैनात झाले होते. ग्रामस्थांसह वाघाच्या ठशाचा शोध घेत होते. परंतू वाघ सध्या या परिसरात आहे की नाही याबाबत कोणतेही ठोस माहीती देतांना ते दिसले नाही. यावरून पळसोनी शिवारात वाघ आला की नाही हे अद्याप तरी स्पष्ट नाही.शेतक-यांनी उपाययोजना म्हणून शेतात जातांना व काम करतांना किमान आवाज देत राहणे अपेक्षीत आहे. मात्र या चर्चेची वनविभागाने योग्य ती खात्री करून परिसरात वाघ आहे की नाही हे स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments