इसमाची गळफास लावून आत्महत्या......

इसमाची गळफास लावून आत्महत्या......
वणी(रवि ढुमणे)

पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील ४० वर्षीय इसमाने स्वतःचे घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील शास्त्रीनगर भागातील देवराव आनंदराव चौधरी या इसमाने घरी कोणी नसल्याचे बघून स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. देवरावची पत्नी कापूस वेचणीचे काम करण्यासाठी शेतात मजुरीला गेली होती.मुलगा निखिल हा परिसरात होता. निखिल घरी गेला तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. निखिलने देवराव ला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तूर्तास रुग्णालयात निखिल एकटाच आहे. कुटुंबातील एकही सदस्य अद्याप आले नव्हते. देवराव ने आत्महत्या का केली हे अस्पष्ट आहे.

Post a Comment

0 Comments