अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल....... मजनूच्या भूमिकेतील प्राध्यापक पसार....

अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल.......
मजनूच्या भूमिकेतील प्राध्यापक पसार.....

वणी(रवि ढुमणे)
वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात सहाय्यक प्राचार्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक महाविद्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून प्राध्यापक असलेला माणिक राठोड हा परिवारासह शहरालगत असलेल्या छोरिया लेआऊट मध्ये राहतो आहे. महाविद्यालयात अकरावी व बारावी या वर्गाला तो शिकवीत असायचा. यातच मुलींच्या अगदी जवळ जाऊन बोलणे, त्यांचा मोबाईल क्रमांक घेणे हा त्याच्या नित्यक्रम होता. नुकताच एक प्रसंग घडला. अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मागे दुचाकी घेऊन जाणे. त्यांची अडवणूक करून बोलण्याचा प्रयत्न करणे आदी खेळ त्याने सुरू केल्याची माहिती मुलींच्या तोंडून ऐकायला मिळाली. इतकेच नव्हे जणू हा त्याचा छंद असल्याची कुणकुण सुद्धा होती. मग तरुण प्राध्यापक असो की विद्यार्थिनी हा मजनू त्यांच्या जवळीक जाण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.   सदर प्राध्यापक विज्ञान विषय शिकवीत नसतांना विज्ञानाच्या वर्गात जाऊन मुलींशी असभ्य वर्तन करीत असे. प्रात्यक्षिक करायला गेल्या की त्या कक्षात जाऊन लगट करण्याचे प्रयत्न करायचा. इतकेच नव्हे तर "पत्नी घरी नाही तुम्ही  माझ्या घरी या " असे बोलायचा. सहायक प्राचार्य असल्याने मुली त्याच्या विरुद्ध जायला घाबरत होत्या. वारंवार असे कृत्य घडत असतांना यातील एकीने कुटुंबातील लोकांना यासंबंधी माहिती दिली. मात्र भीतीने मुली तक्रार देण्यास धजावत नव्हत्या. शेवटी या मजनू प्राध्यापकांच्या कारनाम्याची वार्ता शहरात पसरली आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लोकमान्य टिळक महाविद्यालयात सहायक प्राचार्य असलेल्या माणिक राठोड विरुद्ध एल्गार पुकारला. शेवटी अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून ४२ वर्षीय मजनू प्राध्यापकाविरुद्ध वणी पोलिसात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसात तक्रार होणार असल्याची कुणकुण लागताच माणिक राठोड पसार झाला आहे. ठाणेदार वैभव जाधव आणि डीबी पथक या मजनूच्या शोधात आहे. आणि लोकमान्य टिळक महाविद्यालय प्रशासनाने सुद्धा सदर प्राध्यापकाविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती आहे.  अत्यंत विकृत वृत्ती असलेल्या या मजनूला कडक शासन करण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments