मनसे च्या घेराव नंतर ७०० शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ

पिककर्जासाठी बोरी येथे स्टेट बँकेच्या मॅनेजर ला मनसेचा घेराव...
मनसेचा दणका...७०० शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पीककर्ज.
यवतमाळ तालुक्यातील बोरी येथे शेतकऱ्यांनी गेल्या ६ महिन्यांपासून पुनर्गठन च्या केसेस करण्यासाठी टाळाटाळ करीत होते आज शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बोरी स्टेट बँकेवर धडक दिली. या ठिकाणी मनसेने शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरताच यवतमाळ येथे निघून गेलेले बँक व्यवस्थापक चावरे याना तात्काळ बोलविण्यात आले.या ठिकाणी तब्बल २ तास त्यांना घेराव टाकण्यात आला.
  शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पुनर्गठन च्या केसेस निकाली काढण्यासाठी बँकेच्या रोज खस्ता खाव्या लागत होत्या बँक व्यवस्थपक चावरे हे वशीलबाजीने लोकांची कामे करतात आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय काम करत नाही अश्या स्वरूपाचे गंभीर  आरोप शेतकऱ्यांनी या प्रसंगी केला. या घेरावात मनसेने काही कर्ज प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता न करताच मंजूर केल्याचा आरोप करीत एक प्रकरण व्दारे ते सिद्ध करून दाखविले.गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास ७२० केसेस मंजुरीसाठी प्रलंबित होती.या प्रसंगी वरील सर्व प्रकरणे  तात्काळ निकाली काढण्याची मागणी लावून धरण्यात आली. यावर स्टेट बँक यवतमाळ मुख्य शाखेचे ढोले यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून १ महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याची घोषणा घेरावादरम्यान चावरे यांनी केली. शेतकऱ्यांना यापुढे कधीही पिककर्ज अथवा इतर गोष्टींसाठी त्रास दिल्यास गाठ मनसेशी आहे असा सज्जड इशारा या प्रसंगी शेतकऱ्यांना घेराव आटोपल्यावर मनसेचे अनिल अनिल हमदापुरे यांनी भाषणादरम्यान दिला.बँक व्यवस्थापक चावरे यांनी घेरावात झालेल्या चर्चेचा तपशील शेतकऱ्यांसमोर येऊन देत शेतकऱ्यांना जुलै महिन्यापर्यंत ज्या पुनर्गठन च्य ज्या ७२० केसेस दाखल आहेत त्या एका महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. या घेरावाची सांगता होताच शेतकऱ्यांनी मनसे जिंदाबाद,राजसाहेब ठाकरे जिंदाबाद च्या घोषणा दिल्या .शेतकऱ्यांसाठी मनसे सदैव कटिबद्ध असून कधीही गरज पडल्यास आम्ही आपल्या पाठीशी राहू अशी ग्वाही मनसेच्या नेत्यांनी या प्रसंगी शेतकऱ्यांनी दिली. या आंदोलनात प्रामुख्याने देवा शिवरमवार , अनिल हमदापुरे, सुनील तायडे,गफार ठेकेदार,संजय नागपुरे, बाळू महाजन,शेख वसीम, शंकर कासारकर यासह शेकडो शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments