'निर्भया'ची पुनरावृत्ती, हैदराबाद मध्ये घृणास्पद अमानवी कृत्य.!

'निर्भया'ची पुनरावृत्ती...हैदराबाद मध्ये घृणास्पद अमानवी कृत्य.


डॉक्टर प्रियांका रेड्डी या कामावरून परतत होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्कूटरचे चाक पंक्चर झाले होते त्याचवेळी काही इसमांनी त्यांना चाक पंक्चर असून पुढे जाणे शक्य नसल्याचे सांगितले. बहीण भावना यांनी प्रियांका रेडींना टोलनाक्यावर थांबण्यास सांगितले परंतु एकटे थांबणे बरोबर नाही असे प्रियांका म्हणाल्या आणि निघाल्या. त्याच वेळेस त्यांना एका इसमाने थांबविले आणि सगळी दुकाने बंद आहेत एक मुलगा येऊन पंक्चर काढून देईल असे सांगितले. ती मंडळी शंकास्पद असल्याचे देखील प्रियांका यांनी बहिणीला सांगितले होते. रात्री ९.४४ वाजता प्रियांका यांचा फोन स्विचऑफ लागल्याने त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी प्रियांका यांची बॉडी पूर्ण जळालेल्या अवस्थेत सापडली आणि सामूहिक बलात्कार झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. ह्रिदयाचा थरकाप उडवणारी आणि काळीज पिळवटून काढणारी ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. या विकृत कृत्यांना कधी आळा बसणार याचे उत्तरच कोणाकडे नसल्याचे दिसते आहे. अशा नराधमांना कडक शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे.  

पुन्हा आपण त्याच प्रश्नाकडे येऊन थांबलोय. खरंच आपला देश महिलांसाठी सुरक्षित आहे का?

Post a Comment

0 Comments